नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव..!

Foto

काँग्रेसचा बालेकिल्‍ला मानल्या जाणार्‍या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला असून, तेथे भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर  यांनी चव्हाण यांना पराभवाची धूळ चारली आहे. पहिल्या फेरीअखेर चव्हाण आघाडीवर होते;पण सहाव्या फेरीनंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी आघाडी घेतली आहे. या ठिकाणी चव्हाण, चिखलीकर व वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांच्यात तिरंगी लढत होती. काँग्रेसचा पारंपरिक गड म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात मागील निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसचे अशोक चव्हाण 81455 च्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. मात्र, यावेळी काँग्रेसला ही जागा राखण्यात अपयश आले. वंचित बहुजन आघाडीमुळे होणार्‍या मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळाल्याची चर्चा आहे.